पुणे (प्रतिनिधी) : पशु-पक्षी पाळणे हा अनेकांचा छंद असतो त्यामाध्यमातून अनेक नागरिक आपल्या पशु पक्षामुळे नावारूपाला येत असतात नुकतेच पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील एका कबुतराने आपल्यासह आपल्या मालकाचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद केले आहे. तळेगाव ढमढेरे येथील सोयब बागवान या युवकाला कबुतरे पाळण्याचा छंद असून त्याने अनेक कबुतरे पाळलेली आहेत.

त्यापैकी काही कबुतरे शर्यतीमध्ये सहभागी होणारी असून सोयब याने यापूर्वी मध्यप्रदेश येथे पार पडलेल्या स्पर्धेत त्याच्या बुलेट राजा या कबुतराच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. दरम्यान बुलेट राजाने सात दिवसात तब्बल एक हजार कोलोमीटरचे अंतर पार करुन प्रथम क्रमांक मिळवला होता.

त्यांनतर सोयब याने याबाबतची माहिती वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डच्या साईट वर नोंदवली असता नुकतेच बुलेटराजा या कबुतराची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद होऊन सोयब बागवान यांना त्याबाबतचे पदक व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे तर सोयब यांच्या बुलेट राजा या कबुतराची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे सोयब बागवान यांचे पुणे जिल्हयासह महाराष्ट्रातून कौतुक होत आहे.