मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी दबाव येत आहे. तसेच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

याप्रकरणी त्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिले आहे. यावर त्यांनी ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, याआधी परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने परमबीर आणि अन्य दोघांनी केलेल्या जनहित याचिका रद्द केल्या होत्या. दरम्यान यावेळी देशमुख व सिंह यांच्यासह याप्रकरणी गुंतलेल्यांविरोधात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची अ‍ॅड. जयश्री पाटील यांची याचिकाही न्यायालयाने निकाली काढली होती.