कळे (प्रतिनिधी) : उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील पीडित तरुणीच्या अत्याचाऱ्यांना फासावर लटकवावे, या मागणीचे निवेदन पन्हाळा तालुका काँग्रेस आणि धामणी-कुंभी-कासारी खोऱ्यातील मुख्य काँग्रेस पदाधिकारी यांच्या वतीने कळे पोलीस ठाण्यात देण्यात आले. शिवाय या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला असून, मोदी सरकारवर जोरदार टीका करण्यात आली.
पीडित तरुणीवर अत्याचार करण्याऱ्या नराधमांना उत्तरप्रदेश सरकारने फासावर लटकवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या मागणीचे निवेदन कळे पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीकांत इंगवले यांना देऊन घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. अशा घटनामुळे महिलांच्या मनात असुरक्षितता आणि दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
शेवटी दिनकर पाटील आणि माजी जि. प. सदस्य बाळासाहेब मोळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर, सुरेश बोरवणकर, सुदर्शन पाटील, वाय. डी. पाटील, विलास पाटील(कळेकर), शहाजी चव्हाण, सुनिल चव्हाण, सुनिल पाटील, दिनकर चौगले (हरपवडे) आदी उपस्थित होते.