आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) क्रिकेट जगतातील महान खेळाडू सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना बळी घेणारा पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज अर्शद खान सध्या पाकिस्तानमध्ये बिकट स्थितीत आपले जीवन कंठत आहे. कारण अर्शद खान हा आपला देश सोडून ऑस्ट्रेलियात टॅक्सी चालक म्हणून काम करत आपला उदरनिर्वाह करत आहे.

आज जिथे पाकिस्तानी क्रिकेटपटू जाहिरातींव्यतिरिक्त मॅच फी आणि लीग क्रिकेटमधूनही चांगली कमाई करतात, तर दुसरीकडे अर्शदला परदेशात टॅक्सी चालवावी लागली. एकेकाळी सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंना बाद करणाऱ्या अर्शदबद्दल शेवटची बातमी मिळाली तेव्हा तो ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्सची राजधानी सिडनीमध्ये उबर टॅक्सी चालक म्हणून काम करत होता.

सहकाऱ्यांमध्ये ऑफी म्हणून ओळखल्या जाणार्‍या, या फिरकीपटूने 1997-98 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले आणि पाकिस्तानसाठी 9 कसोटी आणि 58 एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला. पेशावरमध्ये जन्मलेल्या या ऑफस्पिनरने लाल चेंडूच्या कसोटी क्रिकेटमध्ये 32 विकेट घेतल्या, तर 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 56 विकेट घेतल्या.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अर्शदने 187 सामन्यांमध्ये 601 बळी घेतले आहेत, ज्यात 8/80 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचप्रमाणे अर्शदने 163 लिस्ट-ए सामने आणि 9 टी-20 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 189 आणि 7 विकेट्स घेतल्या.