नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानचे नेते काश्मीरला भारतात सावत्र आईची वागणूक मिळत असल्याचे म्हणत आहेत. दुसऱ्या बाजूला जम्मू-काश्मीरचे अंतरिम बजेट हे पाकिस्तानला आयएमएफकडून मिळालेल्या कर्जाच्या चौपट आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या नेत्यांना आता गरळ ओकता येणार नाही.

पाकिस्तान 5 फेब्रुवारीला ‘काश्मीर एकता दिवस’ साजरा करतो. या दिवशी अर्थसंकल्पीय प्रस्तावात भारत सरकारने जम्मू-काश्मीरच्या आर्थिक विकासासाठी मोठी रक्कम दिली आहे. हा महत्त्वाचा अर्थसंकल्प जम्मू आणि काश्मीरमधील अल्पकालीन आर्थिक गरजा तसेच दीर्घकालीन विकास उद्दिष्टे पूर्ण करण्याचा भारताचा हेतू दर्शवतो.

पाकिस्तान काश्मीरवरील राग सोडत नाही

पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. IMF कडून 3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या मदतीने पाकिस्तान आपल्या आर्थिक आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये ते पूर्णपणे बाह्य आर्थिक मदतीवर अवलंबून आहे. IMF च्या कर्जाचा उद्देश पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत रोख प्रवाह वाढवणे आणि आर्थिक सुधारणांसाठी आवश्यक तरलता आणि समर्थन प्रदान करणे हे देखील आहे.