कोल्हापूर (प्रतिनिधी)  : गांधिनगर शासकीय वसाहत रुग्णालयासाठी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करणार, अशी घोषणा कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी येथे केली. गांधीनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्याबाबत निरंकारी भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत ते  बोलत होते. अध्यक्षस्थानी करवीर पंचायत समितीच्या सभापती मीनाक्षी पाटील होत्या. गट विकास अधिकारी जयवंत उगले, सरपंच रितू लालवानी प्रमुख पाहुणे होते.

डॉ विद्या पॉल, डॉ चेतन जुमराणी, डॉ विरेन भोजे, डॉ समीर शहा, डॉ आशिष पाटील, डॉ मेघा पाटील, डॉ बी एस पाटील यांनी कोविड सेंटरबाबत मार्गदर्शन केले. गांधीनगर परिसरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येला रोखण्यासाठी होणाऱ्या कोविड सेंटरला नाश्ता, भोजन, साठ बेड, ॲम्बुलन्स व जनरेटरची सोय निरंकारी ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे. सहा ऑक्सिजन किट देण्याचे अभिवचन ऋतुराज पाटील यांनी दिले.

लोकसहभागातून उभारणाऱ्या कोविड सेंटरसाठी वैद्यकीय स्टाफ, साहित्य, त्याचे नियोजन, स्थानिक डॉक्टरांचा सहभाग याबाबत चर्चा झाली. या बैठकीस निरंकारी सेवा संस्थेचे अमरलाल निरंकारी, श्यामलाल निरंकारी, सेंटरचे समन्वयक धीरज टेहल्याणी, बजरंग रणदिवे, हेमलता माने, ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण, विशाल पहुजा, महेश छाब्रिया, गुड्डू सचदेव, सनी चंदवानी, रोहन बुचडे आदी उपस्थित होते.