कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील प्रथमेश संभाजी कापडे यांची भारतीय डाक विभागात स्पोर्ट्स कोट्यातून मुंबई विभागात डाक सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्याने कमी वयातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा जलतरण स्पर्धेतून चॅम्पियनशिप मिळविली.

प्रथमेशने गेल्या दहा वर्षात राज्यस्तरीय – २४ सुवर्ण, ४ रजत , १ कास्य, राष्ट्रीयस्तरीय – ७ सुवर्ण, ६ रजत, ६ कास्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरती – ४ सुवर्ण, १ रजत अशा पदकांची आपल्या नावे नोंद केली. त्याचे प्राथमिक शिक्षण हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप संचलित समर्थ विद्यामंदिर उंचगाव, माध्यमिक सिद्धकला हायस्कूल मल्हारपेठ, उच्च माध्यमिक ते पदवीपर्यंत श्री.लहु बाळा परितकर महाविद्यालय पणोरे, पदविकाचे एम.ए.प्रथम वर्ष श्रीपतराव चौगुले महाविद्यालय कोतोली येथे घेत आहे.