कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी सैनिक बबनराव मुळीक यांनी आपल्या मृत्यु नंतर आपला सर्व विधी मराठा महासंघाच्या आचारसंहिते नुसार करावा असे सांगितले होते. तसेच बारा दिवसाचा कार्यकाल कमी करून तो सहाव्या दिवशी फक्त फोटो पूजन करण्यात आला. त्याचबरोबर दिवसाचा संपुर्ण अनाठायी खर्च टाळून येथे ७ दिवसाचा शिधा शिये रामनगर येथील अनाथ मुलांच्या करूणालय बालगृह येथे देण्यात आला. यामध्ये जेवण तसेच तांदूळ, तेल, डाळ, बटाटा, भाजीपाला, केळी यासह बेडशीट, चादरी,चटई देण्यात आल्या.

यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, डॉ अमित मुळीक, अमर मुळीक, अमोल मुळीक, दीपक मुळीक, डॉ अभिजित मुळीक, निल मुळीक, नेहा मुळीक,संजय कांबळे,रमेश माने, सोजल माने, प्रणव नाटेकर, अंकीता पाटील, अवधूत पाटील उपस्थित होते.