रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे शिवाजीनगर पोलीस स्टेशन, इचलकरंजी आणि रांगोळी ग्रामपंचायतीने गणेशोत्सवा संदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशाच्या मूर्ती चार फुटापर्यंत बसव्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करणे आणि गणेशाच्या मिरवणूकाला परवानगी नसल्याचे उपनिरीक्षक प्रमोद मगर  यांनी सांगितले. यावेळी सरपंच नारायण भोसले यांनी, गणेशोत्सवाच्या कालावधीत प्रशासनाच्या नियमांचे सर्व मंडळांनी पालन करावे असे आवाहन केले.

यावेळी  तंटामुक्त समिती अध्यक्ष आर. डी. सादळे, आणासो गुंडे, संजय कमते, पो.कॉ. डुणुंग, महेश पाटील, पोलीस पाटील सचिन महाजन, ग्रा.पं. सदस्य, नागरीक उपस्थित होते.