कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील दसरा चौकात ऐन दिवाळीत आज (मंगळवार) भरदिवसा पैसे पडल्याचा बहाणा करून बँकेच्या दारातूनच एका माथाडी कामगारांची दीड लाखांची बँग अज्ञातांने हातोहात लंपास केली.  सकाळी ११.३० च्या सुमारास झालेल्या या चोरीच्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली.   

दरम्यान याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू केला आहे. याबाबत अज्ञाताविरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

फुलेवाडीमधील कोतवालनगर येथे राहणारे माथाडी कामगार पांडुरंग भोसले यांनी आज ११.३० च्या सुमारास दसरा चौकातील कॅनरा बँकेतून दीड लाख रुपयांची रोकड काढली. त्यानंतर  ते कापडी पिशवीत रोकड ठेवून बँकेच्या दारात कट्यावर बसले होते. यावेळी एका अज्ञाताने भोसले यांना खाली तुमचे पैसे पडलेत, असे सांगून लक्ष विचलित केले. आणि हातातील दीड लाखांची रोकड असलेली बँग घेवून धूम ठोकली. ऐन दिवाळीत गजबजलेल्या दसरा चौकात हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली असून लक्ष्मीपुरी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू केला आहे.