कोल्हापूर (प्रतिनिधी) : कै. सौ. हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशन यांच्या तर्फे वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून कदमवाडी (भोसलेवाडी) येथील माझी शाळा, सुसंस्कार हायस्कूल या शाळेतील शिक्षकांना विविध विषयावरील ग्रंथ भेट देण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांच्या हस्ते ही पुस्तके देण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार डॉ. जे. के. पवार यांच्या अर्पण करण्यात आला.

यावेळी राज प्रकाशन यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली व डॉ.जे.के.पवार, प्रा. दिग्विजय पवार, सौ. पदमजा पवार, सौ.श्रध्दा पवार यांनी ‍लिहिलेली राजर्षी शाहूची अर्थनिती, बालकल्याणाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज. सहकार चिंतन,  अर्थायन, गर्जा महाराष्ट्र अपुला, भारत वय वर्षे साठ, बाल कामगार:प्रश्न तुमचा आमचा, कामगार विश्व, भरारी, उदयोजकतेतील नवरत्ने, जनरल नॉलेज, भारतरत्न सर एम.विश्वश्वरय्या, पत्रं पावलेली अन् भावलेली, अशी चाळीस पुस्तके शिक्षकांना भेट देण्यात आली.

यावेळी प्रा.अवधूत पाटील, दीपक जगदाळे, विजय एकशिंगे, प्रकाश ठाणेकर, मुख्याध्यापक विजय भोगम, माझी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अरुणा हुल्ले यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.