मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आपल्या डान्स आणि अभिनयामुळे प्रसिद्ध आहे. तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. नोराने दिलबर, ओ साकी साकी , हाये गरमी अशी अनेक सुपर हिट गाण्यामध्ये ती झळकली आहे. नोरा कायम तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. आज ती तिच्या एका विधानामुळे चर्चेत आली आहे. नोराने बॉलिवूडच्या कपल्सवर निशाणा साधला आहे

अलीकडेच नोराने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी बोलताना तिने बॉलिवूड कपल्सवर निशाणा साधला आहे. नोराने सांगितले की, ‘मी माझ्या आधी अशी अनेक जोडपी पाहिली आहेत ज्यांनी केवळ पैशासाठी लग्न केले.ते त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी लग्न करतात. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, नेटवर्किंग अशा गोष्टींसाठी ते पती किंवा पत्नीचा वापर करतात.

नोरा फतेहीने पुढे सांगितले की, जर कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असेल तर काहीजण विचार करतात की या अभिनेत्यासोबत, अभिनेत्रीसोबत विवाह केला तर माझ्या करिअरचा ग्राफही चांगला भरारी घेईल. सिनेइंडस्ट्रीमध्ये लोक खूपच हिशोबी असतात.अशी लोक पैशांसाठी आपलं सगळं आयुष्य उद्धवस्त करतात. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत प्रेम करत नाही आणि त्याच्यासोबत तुम्ही लग्न करता, यापेक्षा काय वाईट असू शकते .फक्त प्रसिद्धी आणि एका मोठ्या नेटवर्कचा हिस्सा होण्यासाठी ही लोक असे वागतात. आमच्या इंडस्ट्रीमध्ये अशी अनेक लोक असल्याचा दावा तिने केला.

नोराने एका प्रकारे बॉलिवूडचा खरा चेहरा दाखवला आहे. जे बॉलिवूड कपल्स प्रेमात असलेला दिखावे करतात. त्यांचा खरा चेहरा नोराने समोर आणला आहे
तिच्या या विधानाची सर्वत्र चर्चा चालू आहे. चाहते तिचे कौतुक करत आहे