कोल्हापूर ( प्रतिनिधी ) गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवारी कोणाला देणार ? यावरुन भाजपसह मित्रपक्षात शितयुद्ध सुरु आहे. यामध्ये विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना संधी मिळणार का ? यावरुन अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. यावर आता खासदार मंडलिक यांनी भाष्य करत शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करणे हे खासदार शरद पवार यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप मंडलिक यांनी केला आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यात झालेल्या सर्वेवर भाष्य करताना म्हटलं आहे की, माझ्या बाबत निगेटिव्ह सर्व्हे नव्हता, मात्र लोकांनी भरभरून मतदान दिल्याचे ते म्हणाले. जनमत नाही हे कुजक्या मेंदूचे काम असून याचा शोध घेत आता बसत नाही, असा ही टोला त्यांनी यावेळी लगावला.

श्रीकांत शिंदे म्हणाले तुम्ही अस्वस्थ आहात का ?

खासदार मंडलिक यांना श्रीकांत शिंदे यांचा फोन आल्याचेही ते म्हणाले. त्यांनी तुम्ही अस्वस्थ आहात का ? असे विचारले. तसेच उमेदवारी जाहीर होईल असे ही म्हटल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपकडून समरजितसिंह घाटगे यांच्या नावाची चर्चा आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की समरजित घाटगे यांची भेट होत असते, महाडिक यांच्याशी बोलणे सकारात्मक आहे. अनेकांची नावे चर्चेत आहेत, त्यामुळे माझ्यासोबत सरावाच्या कुस्त्या सुरू होत्या असं ते म्हणाले.