मुंबई – बॉलिवूड मध्ये पंगा क्वीन म्ह्णून कंगणा राणौत हिला ओळखले जाते. कंगणाने बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने आपल्या सौन्दर्यासोबतच अभिनयाने सुद्धा चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ती उत्तम अभिनेत्री सोबतच उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. आता कंगणा बॉलिवूड नंतर राजकारणात एन्ट्री मारणार आहे. लोकसभा निवडणुकीत कंगना राणौत भाजपची उमेदवार आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी येथून तिला उमेदवारी मिळाली आहे. मंडीची लेक असलेली कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिला वाटतोय. एका मुलाखतीदरम्यान कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली.

काय म्हणाली कंगणा राणौत..?

चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल ? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला त्यावर कंगना म्हणाली, मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन. खरंतर , मला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल, असे कंगनाने स्पष्टं केलं.लोकांना माझी गरज आहे, असं मला वाटलं तर मी त्याच दिशेने पाऊल टाकेन. या निवडणुकीत जर मी मंडीतून विजयी झाले तर मग मी राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्माते मला सांगतात, की राजकारणात जाऊ नकोस. पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही. मी एक प्रिव्हिलेज्ड आयुष्य जगलं आहे. आता जर मला लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी जोडलं जाण्याची संधी मिळत असेल तर मी तीदेखील स्वीकारेन. अस ती म्हणाली ..