कोल्हापूर : राज्यात आज तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात नागरिकांनी सकाळ पासून मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. कोल्हापुरात दुरंगी लढत होत असल्याने गुलाल कोणाला लागणार? याची उत्सुकता आहे. महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती तर महायुतीकडून संजय मंडलिक निवडणूक लढवत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दोन्ही उमेदवारांसाठी मतदारसंघांमध्ये तळ ठोकलेला होता. त्यामुळे कोणत उमेदवार बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.

राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि महायुतीचे संजय मंडलिक असा थेट सामना होत आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज मतदानाचा दिवस असल्याने नागरिकांनी सकाळपासून मतदानासाठी रांगा लावल्या आहेत.

दरम्यान आज सकाळी 7 पासूनच अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, चंदगड, कागल आणि राधानगरी-भुदरगड असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सकाळच्या पहिल्या दोन तासांमध्ये सर्वाधिक चुरस कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर आणि करवीर या तीन मतदारसंघांमध्ये सर्वाधिक चुरस दिसून येत आहे.