हेल्दी राहण्यासाठी वर्कआऊट अतिशय महत्त्वाचं आहे, हे आपण रोजच ऐकत असतो. कारण आपल्यापैकी अनेकजण फिटनेस फ्रिक असाल. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न देखील केले जातात. पण या सगळ्यात काही जण सकाळी एक्सरसाईज करतात तर काही जणांना संध्याकाळी जिंमिंग करायला आवडतं. पण फिट राहण्यासाठी कोणत्या वेळेतला वर्कआऊट जास्त फायदेशीर ठरतो. हे आज आपण जाणून घेणार आहोत …

सकाळचे वर्कआउट

जेव्हा आपण सकाळी लवकर उठता आणि आपला व्यायाम पूर्ण केला की, आपल्याकडे आराम करण्यासाठी, सामाजिक कार्य करण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी वेळ मिळतो. सकाळच्या व्यायामामुळे आपल्याला चांगली भूक लागते. तुम्ही पोटभर नाश्ता करु शकता, जो आपल्याला संपूर्ण दिवस उत्साही ठेवते. आपले वजन संतुलित राहते आणि पचनक्रियाही चांगली राहते. आपल्या शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतील.

रात्रीचे वर्कआउट

सकाळचे वर्कआउट्स अधिक फायदेशीर असते, संध्याकाळचे वर्कआउट हे सामान्यत: काम करणाऱ्यांसाठी आणि सकाळी अधिक झोप घेणाऱ्यांसाठी सर्वात चांगले असते. रात्रीचे वर्कआउट्स ऑप्टिमल असतात कारण जड व्यायामासाठी ताकद आणि शक्ती मिळते, ज्यामध्ये वजन उचलणे, कार्डिओ आणि त्यानंतर व्यायामाचा समावेश असतो. रात्रीचे वर्कआऊट शरीराला रिलॅक्स करते आणि रात्री झोपही चांगली लागते. संध्याकाळच्या वर्कआऊटसाठी अतिरिक्त वार्म-अपची आवश्यकता नसते, कारण आपले शरीर आधीच सक्रिय असते. तथापि संध्याकाळी उशिरापर्यंत केलेला अधिक व्यायाम आपली झोप खराब करते.

घरात वर्कआऊट करणे योग्य आहे का?

फिटेलोच्या सर्वेक्षण ‘स्टेट ऑफ युवर प्लेट’ नुसार, बहुतेक लोक घरी हलका व्यायाम (46%) किंवा चालणे (55%) पसंत करतात. त्याच वेळी, 58% महिला योग, झुंबा आणि नृत्य करतात. याशिवाय 45 टक्के पुरुषांना जिममध्ये जाणे, धावणे आणि जॉगिंग करणे आवडते. महाकदीप म्हणतात की, लोकांना वेळेची पर्वा न करता सातत्यपूर्ण वर्कआउट रूटीन राखण्यासाठी प्रोत्साहित करणे महत्त्वाचे आहे, कारण हे दीर्घकालीन फिटनेस उद्दिष्टांसाठी महत्त्वाचे आहे.