कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील मार्केट मार्ड परिसरातील दुकानदाराला नेटबँकीग आणि मोबाईल संभाषणाद्वारे फसवणूक करून १० लाख २५ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी प्रकाशलाल मोहनलाल माखीजा (रा. कारंडे मळा, कदमवाडी, कोल्हापूर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मार्केट यार्डमध्ये फिर्यादी प्रकाशलाल यांचे केमसन्स नावचे होलसेल धान्य दुकान आहे. त्यांना गेल्या तीन दिवसांमध्ये अज्ञाताचा ९६१९९५०३७० या नंबर वरुन फोन आला आणि आपण हल्दीराम फूड्स लिमिटेड इंटरनॅशनल कंपनीमधून बोलत असल्याचे सांगितले. कंपनी ड्रिस्ट्रीब्यूटरशीप देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्याने फोनवर कंपनी रजिस्ट्रेशनसाठी २५ हजार ५०० रुपये, त्यानंतर सिकी अँग्रिमेंटसाठी २ लाख, नंतर मटेरियल ऑर्डरसाठी ४ लाख, तसेच आणखीन ४ लाख असे १० लाख २५ हजार रुपये नेटबँकीगच्या माध्यमातून काढून घेतले. त्याचबरोबर इन्शुरन्ससाठी ३ लाखांची मागणी करून ड्रिस्ट्रीब्युटरशीप दिली नाही.

त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात माखीजा यांनी अज्ञाताविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शाहुपुरी पोलीस करीत आहेत.