कुडाळ (प्रतिनिधी) : अणाव येथील श्री स्वयंभु रामेश्वर मंदिरात उद्याा (शुक्रवार) रोजी महाशिवरात्र उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त बुधवारपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये ६ मार्च रोजी रात्रौ ८ वाजता पुराण वाचन, ९ वाजता ह. भ. प. नातू बुवा यांचे सुश्राव्य किर्तन, ७ मार्च रोजी रात्रौ ८ वा. पालखी प्रदक्षिणा, ९ वा. कलेश्वर नाट्य मंडळाचे (सुधीर कलिंगण) महान पौराणिक दशावतारी नाटक, ८ मार्च रोजी पहाटे ४-३० वा रुद्राभिषेक, सकाळी ६-३० महाआरती, वैयक्तिक अभिषेक, दुपारी तीन वाजता ह.भ. प. गोविंद आसोलकर बुवा यांचे सुश्राव्य किर्तन, रात्रौ १२ वाजता श्रींची सवाद्य ढोलताशांच्या गजरात रथातून भव्य मिरवणूक, रात्रौ १ वाजता ओमकार दशावतार नाट्य मंडळ म्हापण यांचे पौराणिक दशावतारी नाटकाचे आयोजन केले आहे.

तरी भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अणाव -हुमरमळा मानकरी, ग्रामस्थ, श्री देव स्वयंभू रामेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अणाव- हुमरमळा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.