कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (गुरुवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ६९ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३८० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ८८६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १३, आजरा तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील ५,  गडहिंग्लज तालुक्यातील २ ,हातकणंगले तालुक्यातील १२, कागल तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ६,  पन्हाळा तालुक्यातील २,शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील १३ अशा एकूण ६९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३८० जण कोरोनामुक्त झाले आहेत. कागल तालुक्यातील १, भुदरगड तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १ आणि बेळगाव मधील चिकोडी तालुक्यातील २ अशा ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७,१२७.

 एकूण डिस्चार्ज – ४२,१३७.   

 उपचारांसाठी दाखल रुग्ण – ३४०८.

 एकूण मृत्यू – १५८२