कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४६ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ९५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १०, आजरा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ५, राधानगरी तालुक्यातील ४, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ८ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा एकूण ४६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. करवीर तालुक्यातील पाचगाव येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर ४४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८, ८६० झाली असून ४६,५९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६७१ जणांचा मृत्यू झाला असून ५९८ जणांवर उपचार सुरू आहेत.