कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १३७५  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (सोमवार) दिवसभरात १,०३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ५० जणांचा मृत्यू झाला असून ६,९९५ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये, कोल्हापूर शहरातील ३८१, आजरा तालुक्यातील ३३, भुदरगड तालुक्यातील ४३, चंदगड तालुक्यातील ३२, गडहिंग्लज तालुक्यातील ९३, गगनबावडा तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील १५५, कागल तालुक्यातील ४९, करवीर तालुक्यातील १७०, पन्हाळा तालुक्यातील ५५, राधानगरी तालुक्यातील २०, शाहूवाडी तालुक्यातील १६, शिरोळ तालुक्यातील १०३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १५८ आणि इतर जिल्ह्यातील ६४ अशा १,३७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ८९,४२९.

डिस्चार्ज – ७३,००९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १३,३१६.

मृत्यू – ३१,०४.