बॉलिवूडचू क्युट आणि चुळबुळी अभिनेत्री म्हणून आलिया भट्ट ला ओळखले जाते तिचे लाखो चाहते आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टचा जन्म 15 मार्च 1993 मध्ये महाराष्ट्रातील मुंबईमध्ये दिग्दर्शक महेश भट्ट आणि सोनी राजदान यांच्या कुटुंबात झाला. आलियाचे वडिल दिग्दर्शक महेश भट्ट हे बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आहेत.

स्टारकिड्ससाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबईतल्या एका शाळेमध्ये आलियाचे शालेय शिक्षण झाले आहे. या शाळेचे नाव जमनाबाई नरसी होय. याच शाळेत तिने शालेय शिक्षण पूर्ण केले.

आलियाने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने, प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक शामक दावर यांच्या डान्स अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर, वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षात आलियाने करण जोहर यांच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल

‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाला भरपूर यश मिळाले. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटानंतर आलियाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या. तिला मिळालेल्या विविध भूमिकांचे तिने सोने केले.

गंगूबाई काठियावाडी, आरआरआर ,2 स्टेट्स राझी ,डिअर जिंदगी गलीबॉय अशी अनेक सुपरहिट सिनेमा आलियाने दिले आहेत.

अभिनेत्री आलिया भट्टचा बॉलिवूडमधला प्रवास तसा वयाच्या 6 व्या वर्षीच सुरू झाला होता. तिने 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संघर्ष’ चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम केले होते.

‘आरआरआर’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ दोन्ही चित्रपटांच्या यशामुळे आलियाची लोकप्रियता वाढली आहे, आलिया आता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे.

‘आरआरआर’ आणि ‘गंगूबाई काठियावाडी’ दोन्ही चित्रपटांच्या यशामुळे आलियाची लोकप्रियता वाढली आहे, आलिया आता सर्वाधिक मानधन घेणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे.

नुकत्याच समोर आलेल्या सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूएशन रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचे नाव टॉप पेड कलाकारांमध्ये समाविष्ट झाले आहे

आलिया भट्टचे लग्न बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूर सोबत २०२२ साली झाले आता त्या दोघांना क्युट मुलगी आहे जिचे नाव राहा कपूर आहे