नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार, अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना तातडीने नवी दिल्ली येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर त्वरित अँँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. या वृत्ताने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून ते लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.

भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, माझे कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी सांगितले की, गुरुवारपासून कपिल यांना अस्वस्थ वाटत होते. आज दुपारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना त्वरित दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी कपिल यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

६१ वर्षीय कपिल देव यांचे भारतीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली विश्वचषक जिंकला. ४०० विकेट्स घेणारे ते पहिले भारतीय गोलंदाज आहेत