जोतिबा (प्रतिनिधी) : श्रीक्षेत्र जोतिबा डोंगर येथे पन्हाळा तालुका भाजपातर्फे जोतिबा मंदिर उघडण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पन्हाळा तालुका भाजपाध्यक्ष सचिन शिपुगडे, जोतिबा ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष आनंदा लादे, व्यापारी नवनाथ लादे, हरिदास उपाध्ये, गजानन जोशी, संतोष ठाकरे, पन्हाळा तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.