रांगोळी (प्रतिनिधी) : पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार कुपोषणमुक्त भारत निर्माण व्हावा, यासाठी दर वर्षी सप्टेंबर महिना ‘पोषण महा’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने रांगोळी येथे एकात्मिक बाल विकास योजने (अंगणवाडी) अंतर्गत  आज (सोमवार) ‘पोषण महा’चे उद्घाटन करण्यात आले.

पुढील महिनाभर विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यावेळी पोषण आहार कशा पद्धतीने दिला पाहिजे. सुदृढ बालक कसे निर्माण केले पाहिजेत,  कुपोषण मुलांची शोध मोहीम व त्यांना आहार कसा घ्यावा, याबाबतची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

यावेळी रांगोळी उपकेंद्राचे कर्मचारी, अश्विनी नवघरे, सुमन पाखरे, अनुराधा आमले, सुपरवायझर शिवाजी चिखले, अंगणवाडीतील सर्व सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते.