मुंबई (प्रतिनिधी) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी कोरोनामुळे त्रस्त असलेल्या ८ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाच्या परिस्थिती आढावा सादर केला.

ते म्हणाले, ‘कोरोना लसीबाबत आम्ही सिरम इन्स्टिट्यूटचे  पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत. महाराष्ट्रात लसीकरण कशा रितीने करावे, लसीचे वितरण कशा प्रकारे करता येईल, या संदर्भात टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आला आहे, तसेच असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.