कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात १६७ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ३०० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११८७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५०, आजरा तालुक्यातील ५, भूदरगड तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील १०, गडहिंग्लज तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील १३, कागल तालुक्यातील ९, करवीर तालुक्यातील १४, पन्हाळा तालुक्यातील ९, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील ४, शिरोळ तालुक्यातील ७, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २३ आणि इतर जिल्ह्यातील १२ अशा एकूण १६७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३०० जण कोरोनामुक्त झालेतं.
दरम्यान, कोल्हापूर शहरातील २,करवीर तालुक्यातील २,भुदरगड तालुक्यातील १,हातकणंगले तालुक्यातील २,कुरंदवाड मधील २, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १,तासगाव मधील १ आणि बेळगावमधील १ अशा १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४६,१८२.
एकूण डिस्चार्ज ३७,५९३.
उपचारासाठी दाखल रुग्ण ७०७५.
आजअखेर एकूण मृत्यू १५१४ झाले आहेत.