कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात १,५०८ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज (बुधवार) दिवसभरात १,७३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ७,१७२ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३६५, आजरा तालुक्यातील २४, भुदरगड तालुक्यातील ३४, चंदगड तालुक्यातील १७, गडहिंग्लज तालुक्यातील ४५, गगनबावडा तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील २०१, कागल तालुक्यातील ४२, करवीर तालुक्यातील २९१, पन्हाळा तालुक्यातील ७७, राधानगरी तालुक्यातील २३, शाहूवाडी तालुक्यातील १५, शिरोळ तालुक्यातील ११४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १६२ आणि इतर जिल्ह्यातील ९५ अशा १,५०८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – १ लाख १६ हजार १७२.

डिस्चार्ज – ९६ हजार ८०९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १५ हजार ५७०.

मृत्यू – ३ हजार ७९३.