कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहे. यातच महावितरण कंपनीकडून देण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांची भर पडली आहे. लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिल इतर राज्यांनी माफ केलेली आहेत.  महाराष्ट्र सरकार संपूर्णपणे वीज बिल माफ करण्यासाठी चालढकल करत आहे.

याचा निषेध करत आज (सोमवार) ऐतिहासिक बिंदू चौक येथे कोल्हापूर जिल्हा लोक जनशक्ती पार्टीच्या  वतीने वीज बिलांची होळी करण्यात आली. जोपर्यंत संपूर्ण वीज बिल माफ होत नाही. तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी दिला.

याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संग्राम यादव,  महासचिव तकदीने कांबळे, चंद्रकांत माने, जिल्हा महिला प्रमुख कोमल माने,  नितीन दळवी,  करवीर तालुका प्रमुख पूनम कांबळे आदीसह कार्येकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.