कोल्हापूर (प्रतिनिधी) : फुलेवाडी सहकार समुहाचे संस्थापक, माजी कृषी राज्यमंत्री श्रीपतराव बोंद्रे यांच्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी आदरांजली वाहिली.

पालकमंत्री पाटील म्हणाले, सहकार, शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रातील बोंद्रे यांचे काम आजही माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचा वसा घेऊन आम्ही चालत आहोत.’

यावेळी नगरसेवक राहुल माने आदी नागरिक उपस्थित होते.