कोल्हापूर  (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आ.  पी. एन. पाटील, जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा  केली आहे. या आघाडीच्या उमेदवारांच्या  प्रचाराचा शुभारंभ गोकुळ  मुख्य प्रकल्प येथील संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आज (बुधवार) करण्यात आला.  

सत्ताधारी राजर्षी शाहू आघाडीची घोषणा मंगळवारी केली होती. त्यानंतर आज सर्व उमेदवारांनी गोकुळचे संस्थापक कै. आनंदराव पाटील – चुयेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण नरके म्हणाले की, सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात एकत्रितरित्या काम करून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे आहेत. पुन्हा एकदा गोकुळवर आपला झेंडा फडकावयाचा आहे.

यावेळी गोकुळचे चेअरमन रवींद्र आपटे,  माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक  रणजितसिंह पाटील,  संचालक विश्वास जाधव, धैर्यशील देसाई,  दीपक पाटील, पी. डी. धुंदरे,  उदय पाटील,  बाळासो खाडे,  अंबरीशसिंह घाटगे,  सत्यजित पाटील, विलास कांबळे, संचालिका अनुराधा पाटील, नवउमेदवार सदानंद  हत्तरकी, चेतन नरके, धनाजीराव देसाई,  प्रकाशराव चव्हाण,  प्रतापसिंह पाटील,  राजाराम भाटळे,  रवीश पाटील,  रणजीत पाटील,  शौमिका महाडिक  आदी उपस्थित होते.