गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मार्चपासून सुरू झालेल्या कोरोना संकटाने संपूर्ण देशाला हैराण केले आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले होते. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्याची रुग्णांची आकडेवारी देखील जास्त होती. पण मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी झाल्याने नागरिकांसह प्रशासनालाही दिलासा मिळाला आहे.
दि. ७ ऑक्टोबर अखेर पर्यंत गडहिंग्लज तालुक्यात १०९० रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या गडहिंग्लज तालुक्यात ३२१ अक्टिव रुग्ण आहेत. यामध्ये कोविड केअर सेंटरमध्ये ४३, कोविड आरोग्य केंद्रामध्ये २०, घरामध्ये उपचार घेत असणाऱ्यांची संख्या १०१ तर सीपीआर आणि खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या ही १५७ आहे.
तालुक्यात एकूण ७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असले तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.