कोल्हापूर (प्रतिनिधी) : माजी महापौर महमद गौस उर्फ बाबू हारूण फरास यांचे आज (रविवार) दिर्घकाळ आजाराने निधन झाले. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९५२ रोजी झाला. १९९९ मध्ये महापालिकेच्या राजकारणात बीन आवाजाचा बाँम्ब फोडून ते महापौर झाले.

त्यावेळचा अभ्यासू आणि धडाडीचा नगरसेवक अशी त्यांची ख्याती होती. वयाच्या २६ वर्षी ते नगरसेवक झाले. १९७८ ते १९८४ तसेच १९८५ ते ९० या काळात ते नगरसेवक म्हणून निवडून आले. तीनवेळा नगरसेवक, शिक्षण समिती सदस्य, तीनवेळा पक्षप्रतोद, विरोधी पक्षनेता अशी विविध पदे त्यांनी भूषविली होती.