मुंबई – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट निवासनाबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 2 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबाराच्या 2-3 राऊंड फायर झाल्या आहेत. मुंबई क्राइम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचलीअसून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याची माहिती समोर येत आहे… ;पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत

अभिनेता सलमान खान याची हत्या करण्याची धमकी देणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) चौकशीत मोठी कबुली दिली होती.लॉरेन्स बिश्नोई याने सलमानला मारण्याची धमकी दिली होती . त्यामुळे सलमान खान याच्या घराबाहेर झालेला गोळीबार लॉरेन्स बिश्नोई यानेच घडवून आणला आहे का? अशी देखील चर्चा सध्या जोर धरत आहे.

यापूर्वी सलमानला मिळाली होती धमकी ..?

यापूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांना घराबाहेर सकाळी जॉगिंग करत असताना 2022 मध्ये एक चिठ्ठी द्वारे धमकी देण्यात आली होती. यामध्ये ‘मुसेवाला जैसा कर देंगे’, असं लिहिण्यात आलं होतं. त्यामुळे सलमान खानची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव पिस्तूलचं लायसन्स देखील देण्यात आलं होतं. तसेच खाजगी सुरक्षारक्षकांमध्ये देखील वाढ करण्यात आली होती. नोव्हेंबर 2023 मध्येही धमकीचा ईमेल ही आला होता. त्यात पुन्हा आता गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.