नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत देशात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानातील काबूलमध्ये पृथ्वी हादरली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार महाराष्ट्रात भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल आणि काश्मीरमध्ये ३.४ इतकी होती.

जम्मू-काश्मीरमध्ये आज (शुक्रवारी) पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. कटरापासून ६२ किमी अंतरावर ईशान्य-उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. कोल्हापूरपासून पूर्वेला १७१ किमी अंतरावर रात्री २.२१ वाजता ३.९ तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या १० किलोमीटर खालीपर्यंत होता. काश्मीरमध्ये पहाटे ३.२८ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, जिथे भूकंपाची खोली जमिनीच्या खाली पाच किलोमीटरपर्यंत होती. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये दुपारी २.५५ वाजता ४.३ तीव्रतेचा भूकंप झाला. येथे भूकंपाचा प्रभाव जमिनीच्या खाली ८० किमी खोलीवर होता.