मुंबई – शाहरुख खान हा बॉलीवूडचा सुपरस्टार आहे. तो बॉलीवूडमध्ये किंग खान म्हणून देखील ओळखले जातो. त्याचे लाखो चाहते आहेत. शाहरुख याने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. शाहरुख नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आज अशाच एका कारणाने शाहरुख चर्चेत आला आहे.

सिनेमा अगदी खरा वाटावा यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी प्रचंड मेहनत घेताना दिसतात. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान यांनीही देवदास सिनेमाच्या वेळी अशीच मेहनत घेतली होती. सिनेमातील प्रसंग खरे वाटावेत यासाठी त्याने चक्क दारू पिऊन शूटिंग केली होती. याच्या खुलासा ज्येष्ठ अभिनेता टिकू सानिया यांनी केला आहे. एका मुलाखतीत टिकू यांनी याबद्दल माहिती सांगितली

संजय भन्साली प्रस्तुत देवदास या चित्रपटात शाहरुख खान हा मद्यपीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या अनेक दृश्यांमध्ये शाहरुख खान खरंच दारू प्यायला आहे. चित्रपटांमध्ये खरोखरचा दारुडा वाटावा यासाठी शाहरुख खान दारू प्यायला आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, चित्रपटातील त्याचा सह-अभिनेता, टिकू तलसानिया यांनी खुलासा केला की, शाहरुख शूटिंगदरम्यान कसा मद्यपान करायचा कारण त्याला विश्वास होता की हे पात्रासाठी आवश्यक आहे.

, चित्रपटात धरमदासची भूमिका साकारणाऱ्या टिकूने शेअर केले, “आम्ही दुपारी कडक उन्हात शूटिंग करत होतो आणि तो एकामागून एक रमचे शॉट्स घेत होता. मी म्हणालो, ‘काय करतोयस? आपल्याला शूटिंग कराची आहे’. तेव्हा शाहरुख टिकूला म्हणाला सर अभिनय होऊन जाईल. डोळ्यात दारू पिल्यासारखं वाटतच नाही. यावर अभिनेता टिकू यांनी शाहरुखच कौतुक केलं. आपल्या पात्रासाठी शाहरुख अत्यंत मेहनत घेतो. तसेच ही एक विलक्षण गोष्ट आहे की दारू पिऊन उत्तम अभिनय देखील करू शकतो.