कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत १६ अभियांत्रिकी पदविका संघ सहभागी झाले होते.

तर अंतिम फेरीत झालेल्या सामन्यात डी. वाय.पॉलिटेक्निक संघाने गव्हर्मेंट पॉलिटेक्निक, रत्नागिरी संघावर २-० असा सलग सेटमध्ये विजय मिळवला. या विजयी संघात प्रथमेश मोरे, अथर्व शिंदे, यश पाटील, हेत छाबिया यांचा समावेश आहे. यावेळी डी. वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, ट्रस्टी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते विजयी संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉ.महादेव नरके, जिमखाना विभागप्रमुख प्रा.अक्षय करपे, रजिस्ट्रार सचिन जडगे, सूरज जाधव उपस्थित होते.