कोल्हापूर (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत असतात. मुलांच्या शारीरिक व मानसिक विकास होण्याच्या या कलावधीत आरोग्याकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही बाब महत्वपूर्ण आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने सुरु करण्यात आलेले शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी अभियानाचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले.


डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थी आरोग्य तपासणी हमी अभियान (स्वास्थ) हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलच्या वतीने वैद्यकीय शिक्षणाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तज्ञ डॉक्टरांच्या कडून गरजू गोर-गरीब रुग्णांना अत्याधुनिक पध्दतीने मोफत वा माफक दरात उपचार केले जातात. आजपर्यंत कोल्हापूर जिल्हयातील व जिल्हया बाहेरील अनेक रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे.


तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पीटलने शालेय विद्यार्थ्यासाठी एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे कौतुक केले. या उपक्रमाचा शालेय विद्यार्थ्याना नक्कीच चांगला फायदा होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला.


मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. आर.के. शर्मा यांनी, हॉस्पीटलमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध सुविधांची माहिती देत ज्या शाळांना विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यायची आहे त्यानी वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.


यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शाळा संघटनेचे अध्यक्ष भरत रसाळे, कोल्हापूर महानगर पालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव, गट शिक्षण अधिकारी विश्वास सुतार, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, वैद्यकिय अधिक्षिका डॉ. वैशाली गायकवाड आदी उपस्थित होते.