आवळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आयुर्वेदातही आवळा खूप फायदेशीर मानला जातो.आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, टॅनिन, फॉस्फरस, लोह आणि कॅल्शियम आढळते.

चवीला तुरट आणि आंबट असणारा आवळा प्रत्येकालाच आवडतो असं नाही. मात्र, आवळ्याला आयुर्वेदामध्ये फार महत्त्व आहे.

ज्या लोकांना अ‍ॅसिडिटी, गॅस किंवा अपचनाच्या समस्या असतील त्यांनी आवळ्याच्या चूर्णाचं सेवन करावं. यामुळे पोटातील जळजळ शांत होते. आवळ्यातील पोषक घटकांमुळे पोटाला थंडावा मिळतो आणि मेंदू देखील शांत होतो.

जर तुम्हाला तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक आणायची असेल, तर तुम्ही तुमच्या आहारात आवळा समाविष्ट करू शकता. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळते,

ज्यांना केसांशी संबंधित समस्या आहेत ते आपल्या आहारात आवळा समाविष्ट करू शकतात. आवळाच्या वापराने केस मजबूत तर होतातच पण केसगळती रोखण्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकते

Indian gooseberry ayurvedic fruit clusters hanging in the tree

रोज एक आवळा खाल्ल्याने डोळ्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होतो. आवळ्याच्या वापराने डोळे निरोगी आणि तंदुरुस्त ठेवता येतात.

व्हिटॅमिन सी आपल्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक चरबी जमा होण्यापासूनही रोखण्याचे कार्य करते. यामुळे दृष्टीवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.