आंबा या फळाला सगळ्यात लोकप्रिय आणि लाडकं फळ मानले जाते. या फळासाठी कित्येक महिने आपलयाला वाट बघावे लागते. आंबा हे असे फळ ज्याचे चाहते लहानांपासून ते मोठ्या पर्यंत आहेत. आंबा हा जवळ-जवळ सगळ्याच लोकांचा प्रिय फळ आहे. आंबा हे अतिशय चवदार आणि आरोग्यदायी फळ आहे. रसाळ आणि गोड आंबे पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. त्यामुळे आपलं पोट भरलं असलं तरी देखील लोक, आंबा खायला कधीही नाही म्हणत नाहीत. गोडपणा आणि चवीसाठी लोकप्रिय असलेल्या आंब्याचे विविध प्रकार आहेत जे खायला चविष्ट असतात. पौष्टिक आकडेवारीनुसार, प्रत्येक आंब्यात (सुमारे 100 ग्रॅम) 15 ग्रॅम कार्ब आणि 14 ग्रॅम साखर असते. त्यामुळे अर्थातच आंब्याचा तुकडा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकतो, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते. म्हणून आंबा हा गोड असल्यामुळे तो मधुमेहाच्या रुग्णांनी खावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, कारण तो गोड असल्यामुळे त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढू शकते.

आरोग्य तज्ञांच्या मते, जर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात असेल तरच तुम्ही आंबा खावा नाहीतर आंबा खाणे पूर्णपणे टाळावे. मात्र जर तुम्ही मर्यादित आणि कमी प्रमाणात आंबा खाल्ला तर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. परंतु मनावर कंट्रोल करत थोड्या प्रमाणातच आंबा खावा, शक्यतो मधुमेही रुग्णांनी रोज अर्ध्यापेक्षा जास्त आंबा खाणे टाळावे… आंबा खात असताना त्यामध्ये किती प्रमाणात गोडवा आहे ते सुद्धा महत्त्वाचे आहे. काही आंब्यांमध्ये इतर आंब्यांपेक्षा कमी गोडवा असतो, तर काहींमध्ये जास्त असतो. त्यामुळे मधुमेह रूग्णांनी त्यानुसार आंबे खावे. ,मात्र ज्या लोकांची शुगर लेव्हल खूप हाय लेव्हलला आहे त्यांनी आंबा न खाणे कधीही चांगलं.

आंबे नक्कीच खाऊ शकता, फक्त ‘हे’ नियम पाळा..!

१. जर तुम्ही साखरेचे पेशंट असाल तर संपूर्ण पिकलेल्या आंब्याच्या तुलनेत थोडा कच्चा आंबा खा. आंबा तयार होताना फारशी साखर आढळत नाही, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही.

२. आंब्याबरोबर दही, चीज किंवा मासे यासारखे प्रथिने स्त्रोत खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.

३. आंब्याच्या रसात साखर मिसळून प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे आंब्याचा रस प्यायल्यास काळजीपूर्वक प्या आणि त्यात साखर मिसळू नका.

४. जास्त आंबा खाणे टाळा. जास्त आंबे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढण्याबरोबरच आपण घेतलेले इन्सुलिन देखील कमी होऊ शकते.