कोल्हापूर (प्रतिनिधी) : शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (रविवार) कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील अजय विठ्ठलराव देसाई यांच्या कुटुंबीयांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईला दहा आणि उत्सव मुर्तीस दोन असा बारा तोळ्याचा दागिने अर्पण केले आहेत.
दरवर्षी करवीर निवासिनी अंबाबाईचा नवरात्र उत्सव लाखो भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडत असतो. मात्र, यंदा कोरोनामुळं मंदिर बंद असल्यानं अंबाबाईचा नवरात्र उत्सव भक्ताविंना सुरू आहे. मंदिरातील सर्व धार्मिक विधी, कार्यक्रम सुरू आहेत. तर ज्या भक्तांना देणगी द्यायची असेल त्यांनी आँनलाईन द्यावी असे आवाहन ही देवस्थान समितीने केले आहे.
दरम्यान, आज रुईकर कॉलनी येथील अजय देसाई यांनी आपल्या कुटुंबीयासमवेत अंबाबाईला दहा तोळे आणि उत्सव मुर्तीस दोन असा बारा तोळ्याचा दागिना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडं सुपूर्द केलायं. देवस्थान समितीच्या वतीने देवीच्या चरणी हा दागिना अर्पण करण्यात आलायं.
यावेळी प. म. दे. समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा सौ.वैशाली क्षीरसागर, व्यवस्थापक धनाजी जाधव,सदस्य राजेंद्र जाधव, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, सहाय्यक सचिव शितल इंगवले, मिलिंद घेवारी, सुयश पाटील यांच्यासह देसाई कुटुंबीय उपस्थित होते.