कोल्हापूर (प्रतिनिधी) : हद्दपार केलेल्या सुभाषनगर येथील अंकुश बामणे (वय ३०)  या सराईत गुन्हेगारास राजाराम पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. सुभाषनगरमधील बीजीएम गणेश मंडळाजवळ वावरत असताना राजारामपुरी पोलिसांनी त्याला पकडले. अंकुश बामणे याच्यावर २८ ऑक्टोबर २०२१ पासून हद्दपारीचा आदेश लागू केला असून तो पुढील २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे.

गणेशोत्सवच्या अनुषंगाने राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दतील गुन्हेगार अंकुश बामणे याला दोन वर्षांकरिता कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. तरी तो हद्दपार आदेशाचा भंग करुन राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आल्याने त्याचाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पोलिसांनी ही कारवाई केली.