कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या कसबा-बावडा येथील पंचगंगा वैकुंठधाम स्मशानभूमीस सामाजिक कार्यकर्ते दिपक पोलादे यांनी ॲल्युमिनीयमची तिरडी येथील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द केली.
पंचगंगा स्मशानभूमीत तसेच शहरातील महानगरपालिकेच्या अन्य स्मशानभूमीस लागणाऱ्या शेणी, लाकूड तसेच तिरडी दान करण्याचे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सामाजिक कार्यकर्ते दिपक पोलादे यांनी ॲल्युमिनीयमची तिरडी कसबा बावडा येथील पंचगंगा वैकुंठधाम स्मशानभूमीत दान दिली. आतापर्यंत पंचगंगा स्मशानभूमीस कदमवाडी, बापटकँम्प येथील स्मशानभूमीस ॲल्युमिनीयमची तिरडी आणि महादेवाची पिंड दान केली आहे.