कोल्हापूर (प्रतिनिधी) : नृत्यकर्मीना उर्जितावस्था आणि स्वबळावर सक्षम उभे राहण्यासाठी राज्यव्यापी नृत्य परिषदेमार्फत संघटन सुरु आहे. या नृत्य परिषदेची कोल्हापुरात शाखा सुरू झाली असून या परिषदेच्या माध्यमातून त्यांना विविध सेवा-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्यामुळे नृत्य परिषदेचे सदस्यत्व स्वीकारून लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष दीपक बिडकर यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत केले.
राज्यातील कर्तृत्व सिद्ध केलेले नृत्य गुरु या परिषदेमध्ये असलेने त्यांच्या ज्ञानाचा फायदा नृत्यकर्मीना होणार आहे. वेस्टर्न नृत्य शैली तसेच विविध लोककला, लोकनृत्य यांच्या अभ्यासक्रमासहित परीक्षा, शिष्यवृत्ती, प्रमाणपत्र आणि शिक्षण राज्यभरात एकाच प्रकारे देण्यात येणार आहे. या नृत्य परिषदेचे सभासद होण्यासाठी नाममात्र २०० रु. फी असून त्यामध्ये दोन लाखाचा नृत्य कलाकारांचा विमा, आईडी कार्ड आणि नॅशनल बँकेत नृत्य बँक खाती काढून देण्यात येणार आहेत. तसेच नृत्य क्षेत्रातील कलावंतांच्या भविष्यासाठी शासकीय योजनांचा आणि केंद्रातील सुविधांचा लाभ सर्वांना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे पश्चिम महाराष्ट्राचे नृत्य परिषदेचे प्रमुख सागर बगाडे यांनी सांगितले.
या वेळी रोहित पाटील, आर्या नाईक यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.