कोल्हापूर  (प्रतिनिधी) : शेतकरी आंदोलन आणि कोरोनामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यंदा आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत. ९ डिसेंबर रोजी सोनिया गांधी यांचा वाढदिवस आहे. मात्र केंद्रातील भाजप सरकारने पाशवी बहूमताच्या जोरावर केलेल्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन आणि कोरोनामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सोनिया गांधी यांनी सर्व कार्यकर्त्यांना सांगितले की, वाढदिवसाला कुठलेही बॅनर, पोस्टर लावू नका. जेवढी शक्य असेल तेवढी शेतकऱ्यांना मदत करा. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसकडून जीवनदान महाभियान रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.