कोल्हापूर : मास्क नाही, तर प्रवेश नाही हे घोषवाक्‍य राज्याला देणारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. सध्या ते मुंबईत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह सचिवपदावर कार्यरत होते. 

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यानंतर त्यांनी लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत आणि नियोजनबध्द पार पाडल्या. याशिवाय महापुराच्या संकटातही त्यांनी दमदार कामगिरी करत दिलासा दिला होता.

दरम्यान, जिल्ह्यात पन्नास ते साठ वर्षांपासून प्रलंबित असलेला चंदगड तालुक्‍यातील ४७ गावांतील ५५ हजार शेतकऱ्यांच्या शेतावरील हेर सरमजांम हा शासकीय शिक्का काढून टाकून त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करुन देण्याचे धाडस देसाई यांनीच केले. याशिवाय शाहूवाडीतील दलित लोकांना त्यांच्या हक्काची जमीन देण्यातही देसाई यांनी पुढाकार घेतला होता. शहरातील बी टेन्यूअरचा मार्गी लावून लोकांचा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी नियोजन केले होते.