कोल्हापूर (प्रतिनिधी) :  डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत आज ध्वजारोहण सोहळा झाला. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी पॉलिटेक्निक, छत्रपती राजाराम हायस्कूल, वाय. बी. पाटील हायस्कूल, विद्यामंदिर, श्री गणेश विद्यालय यांच्यावतीने डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या इमारतीवर सामूहिक ध्वजारोहण सोहळा पार पडला.

यावेळी अधिष्ठाता व जिमखाना विभागप्रमुख डॉ. राजेंद्र रायकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एन. सी. सी. युनिटच्या परेडसह ध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी बी. ए. बाबर, पी.वाय. बेडेकर, सुरेश चव्हाण, तुषार आळवेकर, विराज पसारे, योगेश चौगुले, सनी कदम, पार्थ पाटील, शिवम ढेरे, हर्षवर्धन नाईक, कशीश लालवानी, प्रथमेश भोसले आणि एन. सी. सी. कॅडेट उपस्थित होते. या सोहळ्यास डी. वाय पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे व रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांचे मार्गदर्शन लाभले.