कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेमार्फत रुईकर कॉलनी मैदान येथे दुर्मिळ आणि औषधी अशा वनस्पतीची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे तेथील जुन्या १२ झाडांना काठया, आणि शेडनेट बांधणे, तण काढणे, आळी करणे, औषध फवारणी अशी कामे करण्यात आली. यावेळी अमृत चित्रगार वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढ़े, सतीश कोरडे, परितोष उरकुडे, उदयसिंह जाधव, हर्षवधन बोडके, सौरभ शिंदे, प्रसाद भोपळे, सचिन पोवार आदींनी सहभाग घेतला.

स्वरा फौंडेशनच्यावतीने माझी वसुंधरा अभियानातंर्गत पंचगंगा नदी घाट परिसराची स्वछता करुन प्लास्टिक वेचा मोहिम राबविण्यात आली. त्याचबरोबर जयंती नदी मैला-सांडपाणी पंपिंग स्टेशन नदीच्या काठावर वृक्षारोपण शाखा अभियंता आर. के. पाटील व उपाध्यक्ष पियुष हुलस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वरा फौंडेशनचे प्रमोद माजगावकर,  डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, अध्यक्ष सविता पाडलकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, साक्षी गुंडाकली, मानसी कांबळे व पाणी पुरवठा ड्रेनेज विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते.