कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची क्षयरोगाची तपासणी करण्यात येणार आहे. चार लक्षणांच्या समुह जसे २ आठवाड्यापेक्ष्या जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनामध्ये घट अशी लक्षणे असणाऱ्या कोरोना रुग्णांची तपासणी एक्स-रे आणि सीबीनेटद्वारे क्षयरोग निदान करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ऊषादेवी कुंभार यांनी दिली.
त्या म्हणाल्या, सर्व क्षयरुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. सारी अथवा ईली रुग्णांचींही क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना सहरोगी व्यवस्थापनासाठी क्षयरोगाच्या आरोग्य सुविधा, विलगीकरण सुविधा तयार करण्यात येणार आहे. क्षयरोग असलेले सर्व रूग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. नवीन निदान झालेल्या किंवा सध्या उपचाराखाली असलेल्या सर्व क्षयरुग्णांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली तर त्या रुग्णांस विना विलंब क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमानुसार उपचार करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोना निगेटीव्ह रुग्णांमधून एकूण ४० क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. सारी व ईली निगेटीव्ह रुग्णांमधून ९ क्षयरुग्णांचे निदान झाले आहे. सीपीआरच्या कृष्णा बिल्डिंगमध्ये वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोग तपासणीसाठी बाह्यरुग्ण तपासणी सेवा व निदानासाठी सीबीनेट सुविधा सुरु आहेत. त्याचा लाभ रुग्णांनी घ्यावा.