मुंबई/प्रतिनिधी : काँग्रेसचे उमरेडचे आमदार राजू पारवे यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिंदे सेनेत प्रवेश केला. तर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश होताच पारवेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडल्याचं बोललं जात आहे. राजू पारवे हे रामटेक लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणार आहेत, असा दावा राजू पारवे यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राजू पारवे यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असून ते धनुष्यबाण चिन्हांवर रामटेकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पारवे हे लोकसभा लढणार आहेत. तर महायुतीतमध्ये रामटेक मतदारसंघ शिवसेनेला मिळणार आहे, त्यामुळे राजू पारवेंना रामटेक लोकसभेचं तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात आहे. उमेदवारीसाठीच राजू पारवेंनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती साठी राखीव आहे. शिवसेनेचे कृपाल तुमाने हे सध्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. रामटेक मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची माहिती आहे. भाजपला रामटेकची जागा हवी आहे, पण अद्याप निर्णय झालेला नाही, असं सांगितलं जात असताना आता शिवसेना शिंदे गटाकडून रामटकेची उमेदवारी मिळाल्याचा दावा राजू पारवे यांनी केला आहे.

चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी
चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार की त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळणार की पक्ष धानोरकर यांच्या कलाने घेणार याबाबत उत्सुकता होती. गेल्या तीन दिवसांपासून मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होता. अखेरीस तो दूर झाला. २०१९ च्या निवडणुकीत बाळू धानोरकर यांच्या रूपाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात विजय मिळविला होता. महाराष्ट्रात केवळ एकमेव चंद्रपूरची जागा निवडून आली होती. त्यांच्या निधनानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या मतदारसंघावर दावेदारी केली होती.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. प्रलंबित तिढा सोडवला. येथे आता भाजपचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर असा सामना रंगणार आहे. भाजपने भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक नेते यांना पुन्हा संधी दिली. नेते सलग तिसऱ्यांदा रिंगणात आहेत. काँग्रेसने या जागांवरून अनुक्रमे डॉ. प्रशांत पडोळे आणि डॉ. नामदेव किरसान यांना उमेदवारी दिली आहे. नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे आमदार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे अशी लढत आहे.